शिवभक्तानो छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या " समरभूमी उंबरखिंड " नक्की पाहायला जा…!!!
" समरभूमी उंबरखिंड " ला पोहोचण्याच्या वाटा :
लोणावळा स्थानकाच्या फलाट क्र ५ च्या बाजूने (भूशी डॅमच्या) बाहेर पडावे. तेथून कुरवंडे गावात जाण्यासाठी बस किंवा खाजगी जीप मिळतात. त्याने १० मिनीटात आपण कुरवंडे गावात पोहोचतो. गावातूनच उजव्या हाताला ‘‘ड्यूक्स नोजचा’’ सुळका दिसतो तो चढून परत येण्यास साधारण १ तास लागतो.
कुरवंडे गाव घाट माथ्यावर आहे. तेथून उंबरखिंड उतरण्यासाठी मळलेली पायवाट होती. पण अलिकडेच गॅस कंपनीने पाईप लाईन टाकताना कच्चा रस्ता बनविलेला आहे. त्या रस्त्याने १ तासात आपण पायथ्याच्या चावणी गावात पोहोचतो. चावणी गावापासून ३० मिनीट अंतरावर ‘समरभूमी उंबरखिंड’ असा फलक डाव्या हाताला दिसतो. तेथून अंबानदीचे पात्र ओलांडल्यावर आपण स्मारकापाशी येतो. या स्मारकावर महाराजांची आज्ञापत्रे व उंबरखिंडीचा इतिहास कोरलेला आहे. येथून ठाकूरवाडी मार्गे पाली - खोपोली रस्त्यावरील शेमडी गावात पोहोचण्यासाठी १ तास लागतो. शेमडी गावातून बस अथवा रिक्षाने खोपोलीला जाता येते. उंबरखिंडीचा ट्रेक ९ मैलाचा व पूर्ण दिवसाचा आहे.
लोणावळा - कुरवंडे - चावणी - ठाकूरवाडी - शेमडी - खोपोली या मार्गाने जाता येते किंवा खोपोली -शेमडी या मार्गाने उंबरखिंड स्मारकापर्यंत जीपसारखे वहान पावसाळा सोडून आणता येते.
शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!!

महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा पेज आहे. फक्त एकदा या पेज भेट द्या__/\__
https://www.facebook.com/MAZASAHYADRIMAZAABHIMAN

Comments

Popular posts from this blog

RAIGAD FORT--- दुर्गदुर्गेश्वर रायगड ( DURGDURGESHWAR RAIGAD )

JEJURI FORT-- JAY MALHAAR...सोन्याची जेजुरी…!!!

Khidkaleshwar Ancient Shiv Mandir - खिडकाळेश्वर प्राचीन शिवमंदिर