Posts

सिंह सिवराज है....!!! ( SER SIVRAJ HAI )

Image
थरथर कापत कुतूबशाही गोलकुंडा, हहरि हबस भूप भीर भरकती है ll  सिंह सिवराज तेरे घौसा की पुकार सूनी, केते पातसाहन की छाती धरकती है ll                        कविराज भूषण.......  मराठी अर्थ :- शिवाजी या नावाने गोवळकोंड्याचा कुतुबशाह बादशहा थरथर कांपत आहे. हबशी राजे तर भयभीत होऊन पळून जाण्याच्या तयारीत आहेत. हे सिंह शिवाजीराजा! असे म्हणतात की तुमच्या आक्रमणाची तुतारीची ललकार ऐकून बादशहाची छाती धडधड करते.
Image
शिवभक्तानो छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या " समरभूमी उंबरखिंड " नक्की पाहायला जा…!!! " समरभूमी उंबरखिंड " ला पोहोचण्याच्या वाटा : लोणावळा स्थानकाच्या फलाट क्र ५ च्या बाजूने (भूशी डॅमच्या) बाहेर पडावे. तेथून कुरवंडे गावात जाण्यासाठी बस किंवा खाजगी जीप मिळतात. त्याने १० मिनीटात आपण कुरवंडे गावात पोहोचतो. गावातूनच उजव्या हाताला ‘‘ड्यूक्स नोजचा’’ सुळका दिसतो तो चढून परत येण्यास साधारण १  तास लागतो. कुरवंडे गाव घाट माथ्यावर आहे. तेथून उंबरखिंड उतरण्यासाठी मळलेली पायवाट होती. पण अलिकडेच गॅस कंपनीने पाईप लाईन टाकताना कच्चा रस्ता बनविलेला आहे. त्या रस्त्याने १ तासात आपण पायथ्याच्या चावणी गावात पोहोचतो. चावणी गावापासून ३० मिनीट अंतरावर ‘समरभूमी उंबरखिंड’ असा फलक डाव्या हाताला दिसतो. तेथून अंबानदीचे पात्र ओलांडल्यावर आपण स्मारकापाशी येतो. या स्मारकावर महाराजांची आज्ञापत्रे व उंबरखिंडीचा इतिहास कोरलेला आहे. येथून ठाकूरवाडी मार्गे पाली - खोपोली रस्त्यावरील शेमडी गावात पोहोचण्यासाठी १ तास लागतो. शेमडी गावातून बस अथवा रिक्षाने खोपोलीला जाता येते. उंबरखिंडीचा ट्र...
Image
उंबरखिंडी मधील स्मारकावर असलेले छत्रपती शिवरायांचे तेजस्वी शिल्प…!!! या शिल्पात छत्रपती शिवरायांचे तेजस्वी, राजबिंड रूप दिसून येते. या शिल्पात छत्रपती शिवराय पूर्ण युद्धसाहित्यानिशी दिसतात. शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!! महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा पेज आहे. फक्त एकदा या पेज भेट द्या__/\__ https://www.facebook.com/ MAZASAHYADRIMAZAABHIMAN
Image
हे आहे उंबरखिंडी मधील " गनिमी कावा " या युद्धनीतीचे स्मारक…!!! गनिमी कावा ही शिवशाहीची प्रमुख युद्धनीती होती. छत्रपती शिवरायांनी याच गनिमी कावाच्या जोरावर अनेक मोहीम, लढाया जिंकल्या. या स्मारकामध्ये वरच्या बाजूला युद्धात वापरण्यात येणाऱ्या  ढाल, तलवार, भाले, धनुष्य , बाण अशा शस्त्र ची प्रतिकृती उभारण्यात आली आहे . शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या भौगोलीक रचनेचा फायदा घेऊन गनिमीकाव्याने, कमीत कमी सैन्याने मोघलांच्या बलाढ्य फौजेचा धुव्वा उंबरखिंडीत उडवला होता. ह्या अप्रतिम घटनेची साक्षिदार असलेल्या उंबरखिंडीचे हे स्मारक नक्की पहा…!!! शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!! महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा पेज आहे. फक्त एकदा या पेज भेट द्या__/\__ https://www.facebook.com/MAZASAHYADRIMAZAABHIMAN
Image
उंबरखिंड हा पुण्या - मुंबईहून एका दिवसात करता येण्यासारखा सुंदर व सोपा ट्रेक आहे. उंबरखिंडी बरोबर लोणावळ्याच्या ‘ड्युक्स नोज’ चा डोंगरही पाहाता येतो. शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या भौगोलीक रचनेचा फायदा घेऊन गनिमीकाव्याने, कमीत कमी सैन्याने मोघलांच्या बलाढ्य फौजेचा धुव्वा उंबरखिंडीत उडवला होता. ह्या अप्रतिम घटनेची साक्षिदार असलेल्या उंबरखिंडीचा सोपा ट्रेक एकदा तरी करावाच असा आहे. उंबरखिंडीचा इतिहास जाणून घेण्यापूर्वी तीची भौगोलिक रचना जाणून घेणे महत्वाचे आहे. घाटावरुन कोकणात उतरण्यासाठी अनेक घाटवाटा आहेत. त्यातील एक कुरवंडे घाट, हा घाट लोणावळ्यापासून कोकणातील उंबरे गावापर्यंत जातो. लोणावळ्याकडून येताना सह्याद्रीचा खडा पहाड उतरुन आपण हा चावणी गावापाशी येतो. इथे आपल्याला अंबा नदी भेटते. ही नदी ठाकूरवाडीपर्यंत आपली सोबत करते. चावणी ते ठाकूरवाडी दरम्यान अंबानदीच्या पात्राच्या बाजूने जाणारी चिंचोळी पायवाट दाट जंगलातून जाते. या वाटेच्या दोन्ही बाजूला टेकड्या आहेत. त्यामुळे या मार्गाची रचना नळीसारखी आहे. या नळीचे बूच म्हणजे ठाकूरवाडीची टेकडी. या टेकडीखालीच अंबानदी उजवीकडे वळण घेते. या नळी...
Image
सह्याद्रीच्या छाताडातून, नाद भवानी गाजे …काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे !!…तुफ़ान गर्जतो, आग ओकतो,वाघ मराठी माझा !…सन्मान राखतो, जान झोकतो तुफानं मातीचा राजा...!!! जगदवंदनीय, विश्वभुषण छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !! शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!!
Image
एकच राजे शिवछत्रपती माझे…!!!