हे आहे उंबरखिंडी मधील " गनिमी कावा " या युद्धनीतीचे स्मारक…!!! गनिमी कावा ही शिवशाहीची प्रमुख युद्धनीती होती. छत्रपती शिवरायांनी याच गनिमी कावाच्या जोरावर अनेक मोहीम, लढाया जिंकल्या. या स्मारकामध्ये वरच्या बाजूला युद्धात वापरण्यात येणाऱ्या ढाल, तलवार, भाले, धनुष्य , बाण अशा शस्त्र ची प्रतिकृती उभारण्यात आली आहे . शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या भौगोलीक रचनेचा फायदा घेऊन गनिमीकाव्याने, कमीत कमी सैन्याने मोघलांच्या बलाढ्य फौजेचा धुव्वा उंबरखिंडीत उडवला होता. ह्या अप्रतिम घटनेची साक्षिदार असलेल्या उंबरखिंडीचे हे स्मारक नक्की पहा…!!! शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!! महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा पेज आहे. फक्त एकदा या पेज भेट द्या__/\__ https://www.facebook.com/MAZASAHYADRIMAZAABHIMAN
Posts
Showing posts from December, 2014
- Get link
- X
- Other Apps
उंबरखिंड हा पुण्या - मुंबईहून एका दिवसात करता येण्यासारखा सुंदर व सोपा ट्रेक आहे. उंबरखिंडी बरोबर लोणावळ्याच्या ‘ड्युक्स नोज’ चा डोंगरही पाहाता येतो. शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या भौगोलीक रचनेचा फायदा घेऊन गनिमीकाव्याने, कमीत कमी सैन्याने मोघलांच्या बलाढ्य फौजेचा धुव्वा उंबरखिंडीत उडवला होता. ह्या अप्रतिम घटनेची साक्षिदार असलेल्या उंबरखिंडीचा सोपा ट्रेक एकदा तरी करावाच असा आहे. उंबरखिंडीचा इतिहास जाणून घेण्यापूर्वी तीची भौगोलिक रचना जाणून घेणे महत्वाचे आहे. घाटावरुन कोकणात उतरण्यासाठी अनेक घाटवाटा आहेत. त्यातील एक कुरवंडे घाट, हा घाट लोणावळ्यापासून कोकणातील उंबरे गावापर्यंत जातो. लोणावळ्याकडून येताना सह्याद्रीचा खडा पहाड उतरुन आपण हा चावणी गावापाशी येतो. इथे आपल्याला अंबा नदी भेटते. ही नदी ठाकूरवाडीपर्यंत आपली सोबत करते. चावणी ते ठाकूरवाडी दरम्यान अंबानदीच्या पात्राच्या बाजूने जाणारी चिंचोळी पायवाट दाट जंगलातून जाते. या वाटेच्या दोन्ही बाजूला टेकड्या आहेत. त्यामुळे या मार्गाची रचना नळीसारखी आहे. या नळीचे बूच म्हणजे ठाकूरवाडीची टेकडी. या टेकडीखालीच अंबानदी उजवीकडे वळण घेते. या नळी