ELLORA CAVE - WORLD HERITAGE SITE #THE_PRIDE_OF_MAHARASHTRA महाराष्ट्रातील मराठवाडा भागात औरंगाबाद पासून ३० किमी अंतरावर वेरूळ हे एक गाव असून येथे प्राचीन लेणी आहेत. येथे १७ हिंदू, १२ बौद्ध आणि ५ जैन अशी एकूण ३४ लेणी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे भोसले घराण्याचे मूळ गाव वेरूळ आहे. वेरूळची लेणी साधरणत: इसवी सनाच्या पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरली असून प्राचीन भारतातील हिंदू ,बौद्ध आणि जैन धर्मातील परस्परसंहिता प्रकर्षाने या लेण्यामध्ये दिसून येते. वेरुळच्या लेण्यांची हिंदू लेणी, बौद्ध लेणी, आणि जैन लेणी अशी विभागणी केली आहे. हिंदू लेण्यामध्ये शिल्पकारांनी कातळात कोरलेली अतिप्रचंड शिल्पे आहेत. यातील बरीचशी लेणी वरपासून खालपर्यंत कोरीवकाम करीत निर्मिलेली आहेत. अशी लेणी कोरण्यासाठी कारागीरांच्या अनेक पिढ्या खर्ची पडल्याचा उल्लेख आहे. हिंदू लेण्यामधील वेरूळमधल्या १६ व्या लेण्यातले शिवमंदिर जगातील सर्वात मोठे कोरीव शिल्प असून या बहुमजली मंदिराची रचना कैलास पर्वताच्या धर्तीवर निर्मिलेली आहे. मंदिर निर्माण करायला अंदाजे दोन लाख टन वजनाचा एक अखंड खडक वाप