RAIGAD FORT--- दुर्गदुर्गेश्वर रायगड ( DURGDURGESHWAR RAIGAD )
दुर्गदुर्गेश्वर रायगड...!!! हा आहे दुर्गदुर्गेश्वर रायगडच्या पायथ्याशी असलेला " नाना दरवाजा "…!!! >>> नाना दरवाजा <<< या दरवाजास ’नाणे दरवाजा’ असेही म्हणत. या दरवाजाचा संबंध गैरसमजूतीने नाना फडणिसांशी लावला जातो. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा आहे. इ.स. १६७४ च्या मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील " हेन्री ऑक्झेंडन" याच दरवाजाने आला होता. या दरवाज्यास दोन कमानी आहेत. दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकर्यांसाठी दोन लहान खोल्या आहेत, त्यांस ’देवड्या’ म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात. या नाणे दरवाजाची अवस्था खूप बिकट आहे. शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!! ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- दुर्गदुर्गेश्वर रायगडचा बुलंद, बेलाद असा " महादरवाजा "…!!! महादरवाज्याच्या बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. दरवाज्यावर असणार्या या दोन कमळा
Comments
Post a Comment