Posts

Showing posts from March, 2018

The Sword Of Shivray - भवानी तलवार

Image
कधी नंग्या समशेरीची जरब बसवून तर कधी मखमली म्यानत लपलेल्या तलवारीची नुसती मुठ दाखवून शत्रूंना आपल्या धाकात ठेवण्याचे कसब फक्त छत्रपती शिवरायांनाच अवगत होते...! #भवानी_तलवार #शककर्ते_शिवराय #आमचं_इमान_रायगडाच्या_मातीशी

ONLY SHIVRAY

Image
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा आचार शील, विचारशील, दानशील, धर्मशील सर्वज्ञपणे सुशील, सकळांठायी धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर सावधपणे नृपवर, तुच्छ केले देव धर्म गोब्राम्हण, करावया संरक्षण हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसी धाक सुटला कित्येकांस आश्रय जाहला, शिवकल्याण राजा.

Rajmudra - राजमुद्रा ( The Royal Seal )

Image

NANEGHAT- नाणेघाट

Image
नाणेघाट  जिल्हा : पुणे      श्रेणी : मध्यम नाणेघाट सुमारे सव्वादोन हजार वर्षापूर्वी खोदला गेला. प्रतिष्ठान (पैठण) ही सातवाहनांची राजधानी होती. सातवाहन काळात कल्याण ते प्रतिष्ठान या राजमार्गावर जुन्नर जवळ डोंगर फोडून नाणेघाटाची निर्मिती केली गेली. सातवाहन कुल हे महाराष्ट्रातील प्राचीन असे कुल आहे आणि त्र्‍यांचे राज्य इ.स पूर्व २५० ते इ.स नंतर २५० असे जवळजवळ पाचशे वर्ष होते. प्राचीन काळी कल्याण बंदरामध्ये उतरणारा माल व्यापारी घोडे अथवा बैलावर वाहून नेत असत. हा माल प्रामुख्याने सातवाहन काळातील राजधानी असलेल्या प्रतिष्ठान नगरीत व्यापारासाठी नेला जाई. नाणेघाटाचा वापर केल्याबद्द्ल या व्यापार्‍र्‍यांकडून जकात जमा केली जात असे. त्या जकातीचा दगडी रांजण आजही नाणेघाटात पाहावयास मिळतो. गेली सुमारे सव्वादोन हजार वर्षे वापारात असणारा नाणेघाट आजही नव्या- जून्या ट्रेकर्सना खुणावत असतो.