NANEGHAT- नाणेघाट
नाणेघाट
जिल्हा : पुणे
श्रेणी : मध्यम
नाणेघाट सुमारे सव्वादोन हजार वर्षापूर्वी खोदला गेला. प्रतिष्ठान (पैठण) ही सातवाहनांची राजधानी होती. सातवाहन काळात कल्याण ते प्रतिष्ठान या राजमार्गावर जुन्नर जवळ डोंगर फोडून नाणेघाटाची निर्मिती केली गेली. सातवाहन कुल हे महाराष्ट्रातील प्राचीन असे कुल आहे आणि त्र्यांचे राज्य इ.स पूर्व २५० ते इ.स नंतर २५० असे जवळजवळ पाचशे वर्ष होते. प्राचीन काळी कल्याण बंदरामध्ये उतरणारा माल व्यापारी घोडे अथवा बैलावर वाहून नेत असत. हा माल प्रामुख्याने सातवाहन काळातील राजधानी असलेल्या प्रतिष्ठान नगरीत व्यापारासाठी नेला जाई. नाणेघाटाचा वापर केल्याबद्द्ल या व्यापार्र्यांकडून जकात जमा केली जात असे. त्या जकातीचा दगडी रांजण आजही नाणेघाटात पाहावयास मिळतो. गेली सुमारे सव्वादोन हजार वर्षे वापारात असणारा नाणेघाट आजही नव्या- जून्या ट्रेकर्सना खुणावत असतो.
Comments
Post a Comment