Posts

Showing posts from October, 2018

Umberkhind - उंबरखिंड

Image
                      '' समरभूमी   उंबरखिंड '' उंबरखिंड हा पुण्या - मुंबईहून एका दिवसात करता येण्यासारखा सुंदर व सोपा ट्रेक आहे. उंबरखिंडी बरोबर लोणावळ्याच्या ‘ड्युक्स नोज’ चा डोंगरही पाहाता येतो. शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या भौगोलीक रचनेचा फायदा घेऊन गनिमीकाव्याने, कमीत कमी सैन्याने मोघलांच्या बलाढ्य फौजेचा धुव्वा उंबरखिंडीत उडवला होता. ह्या अप्रतिम घटनेची साक्षिदार असलेल्या उंबरखिंडीचा सोपा ट्रेक एकदा तरी करावाच असा आहे. इतिहास : उंबरखिंडीचा इतिहास जाणून घेण्यापूर्वी तीची भौगोलिक रचना जाणून घेणे महत्वाचे आहे. घाटावरुन कोकणात उतरण्यासाठी अनेक घाटवाटा आहेत. त्यातील एक कुरवंडे घाट, हा घाट लोणावळ्यापासून कोकणातील उंबरे गावापर्यंत जातो. लोणावळ्याकडून येताना सह्याद्रीचा खडा पहाड उतरुन आपण हा चावणी गावापाशी येतो. इथे आपल्याला अंबा नदी भेटते. ही नदी ठाकूरवाडीपर्यंत आपली सोबत करते. चावणी ते ठाकूरवाडी दरम्यान अंबानदीच्या पात्राच्या बाजूने जाणारी चिंचोळी पायवाट दाट जंगलातून जाते. या वाटेच्या दोन्ही बाजूला टेकड्या आहेत. त्यामुळे या मार्गाची रचना नळीसारखी आहे. या

Khidkaleshwar Ancient Shiv Mandir - खिडकाळेश्वर प्राचीन शिवमंदिर

Image
                                      खिडकाळेश्वर प्राचीन शिवमंदिर ऐतिहासिक कल्याण परिसरावर पूर्वी शालिवाहन राजांची सत्ता होती. शालिवाहन राजे शिवप्रेमी असल्याने कल्याण-ठाणे परिसरांत अनेक प्राचीन शिवमंदिरे आहेत. कल्याण-शिळफाटा मार्गावरील खिडकाळी येथील शिवमंदिर हे त्यापैकीच एक. काळ्या पाषाणात कोरलेले हे मंदिर खूपच आकर्षक वाटते. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराप्रमाणेच हे मंदिरही स्थापत्य आणि वास्तुशास्त्राचा आदर्श नमुनाच आहे. कल्याण -शिळफाटा मार्गावरील शिळफाटय़ाच्या अलीकडे खिडकाळेश्वर मंदिर आहे. हेमाडपंथी शिल्पकलेचा आविष्कार हे मंदिर पाहताना दिसतो. या मंदिराच्या भिंतीवर सुबक कलाकुसर करण्यात आली आहे. मंदिराचे खांब, प्रवेशद्वार, खिडकी, कोनाडे यांची रचना अप्रतिम असून एक उत्तम शिल्प पाहात असल्याचे हे मंदिर पाहताना वाटते. मंदिरातील शिवगाभारा खोलवर असून, काही पायऱ्या उतरून शिवलिंगापर्यंत जाता येते. मंदिराच्या बाहेर एक दगडी शिल्प असून, भाविक या शिल्पाचेही दर्शन घेतात. त्यामुळे ती पूजनीय शिळा असावी. मंदिर परिसरात इतरही अनेक देवांची मंदिरे आहेत. अनेक बाबा-महाराजांची समाधीस्थळेही आहेत. काही