Posts
Showing posts from May, 2017
SHIVRAY SHIRAY ANI FAKT SHIVRAY
- Get link
- X
- Other Apps
शिवरायांचे आठवावे रूप ।शिवरायांचा आठवावा प्रताप ।शिवरायांचा आठवावा साक्षेप ।भूमंडळी ।।१।। शिवरायांचे कैसें बोलणें ।शिवरायांचे कैसें चालणें ।शिवरायांची सलगी देणे ।कैसी असे ।।२।। सकल सुखांचा केला त्याग ।म्हणोनि साधिजें तो योग ।राज्यसाधनाची लगबग ।कैसीं केली ।।३।। याहुनी करावें विशेष ।तरीच म्हणवावें पुरुष ।या उपरीं आता विशेष ।काय लिहावे ।।४।। शिवरायांसी आठवावें ।जीवित तृणवत् मानावें ।इहलोकी परलोकीं उरावे ।कीर्तीरूपें ।।५।। निश्चयाचा महामेरू ।बहुत जनांसी आधारू ।अखंड स्थितीचा निर्धारु ।श्रीमंत योगी ।।६।।
SARASGAD - सरसगड
- Get link
- X
- Other Apps
SARASGAD - सरसगड सरसगड माची व बालेकिल्ला या दोन भागात विभागलेला आहे. पाली गावातून डोंगरधारेवरून गडाच्या माचीवर जातांना दोन कातळ कड्यांमध्ये (नाळेत) कातळात खोदलेल्या १०० पायर्या चढाव्या लागतात. पायर्यांच्या वाटेवर कातळात कोरून काढलेले प्रवेशव्दार पाहायला मिळते. प्रवेशव्दारावर कलश कोरलेला आहे. प्रवेशव्दारच्या आतील बाजूस खांब असलेली खोली (देवडी) आहे. पायर्या संपल्यावर आपला दिंडी दरवाजातून माचीवर प्रवेश होतो. दिंडी दरवाजाला लागूनच तिहेरी तटबंदीची रचना आपणास बघावयास मिळते. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे वळावे आणि १५ पायर्या वर चढाव्यात, म्हणजे तटबंदी दिसते. दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे गेल्यावर एक मोठा पाण्याचा हौद (‘मोती हौद’) आहे. पुढे तसेच उत्तरेकडे चालत गेल्यावर पाण्याच एक टाक व वास्तुंचे काही चौथरे पाहायला मिळतात. उत्तर टोकाला एक दगडांनी बांधलेला दरवाजा आहे. त्याला उत्तर दरवाजा म्हणतात. दरवाजा जवळ एक भुयारी मार्ग आहे. सध्या हा मार्ग मात्र बुजलेला आहे. पुढे गडावर येणारा दुसरा मार्ग आहे. दरवाजातून खाली उतरून गेल्यावर उजवीकडे कातळात खोदलेल्या गुहा आहेत. परत दरवाजाजवळ येऊ
Chattrapati Shivaji Maharaj Statue - Gate Way Of India
- Get link
- X
- Other Apps