SHIVRAY SHIRAY ANI FAKT SHIVRAY


शिवरायांचे आठवावे रूप ।शिवरायांचा आठवावा प्रताप ।शिवरायांचा आठवावा साक्षेप ।भूमंडळी ।।१।।शिवरायांचे कैसें बोलणें ।शिवरायांचे कैसें चालणें ।शिवरायांची सलगी देणे ।कैसी असे ।।२।।सकल सुखांचा केला त्याग ।म्हणोनि साधिजें तो योग ।राज्यसाधनाची लगबग ।कैसीं केली ।।३।।याहुनी करावें विशेष ।तरीच म्हणवावें पुरुष ।या उपरीं आता विशेष ।काय लिहावे ।।४।।शिवरायांसी आठवावें ।जीवित तृणवत् मानावें ।इहलोकी परलोकीं उरावे ।कीर्तीरूपें ।।५।।निश्चयाचा महामेरू ।बहुत जनांसी आधारू ।अखंड स्थितीचा निर्धारु ।श्रीमंत योगी ।।६।।

Comments

Popular posts from this blog

RAIGAD FORT--- दुर्गदुर्गेश्वर रायगड ( DURGDURGESHWAR RAIGAD )

Khidkaleshwar Ancient Shiv Mandir - खिडकाळेश्वर प्राचीन शिवमंदिर

JEJURI FORT-- JAY MALHAAR...सोन्याची जेजुरी…!!!