RAIGAD FORT--- दुर्गदुर्गेश्वर रायगड ( DURGDURGESHWAR RAIGAD )
दुर्गदुर्गेश्वर रायगड...!!! |
>>> नाना दरवाजा <<<
या दरवाजास ’नाणे दरवाजा’ असेही म्हणत. या दरवाजाचा संबंध गैरसमजूतीने नाना फडणिसांशी लावला जातो. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा आहे. इ.स. १६७४ च्यामे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील " हेन्री ऑक्झेंडन" याच दरवाजाने आला होता. या दरवाज्यास दोन कमानी आहेत. दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकर्यांसाठी दोन लहान खोल्या आहेत, त्यांस ’देवड्या’ म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात.
या नाणे दरवाजाची अवस्था खूप बिकट आहे.
शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!!
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
दुर्गदुर्गेश्वर रायगडचा बुलंद, बेलाद असा " महादरवाजा "…!!!
महादरवाज्याच्या बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. दरवाज्यावर असणार्या या दोन कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत ’श्री आणि सरस्वती’ नांदत आहे. ’श्री आणि सरस्वती’ म्हणजेच ’विद्या व लक्ष्मी’ होय. महादरवाज्याला दोन भव्य बुरूज असून एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास ’जंग्या’ म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकर्यांच्या देवड्या दिसतात. तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्या दिसतात. महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे.
शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!!
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
रायगडाच्या महादारवाजाचा उंबरठा शिवप्रभूंच्या, जयोस्तु शिवशाहीच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. त्याचप्रमाणे लाखो शिवभक्तांच्या, दुर्गप्रेमींची पायधूळ याच उंबरठयाला लागून पावन झाली आहे.
म्हणून रायगडाच्या महादारवाजाचा उंबरठयावर नतमस्तक होताना आले मना…!!!
धन्य जाहलो टेकुणी माथा हे दुर्गदुर्गेश्वर रायगडा…!!!शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!!
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हि जागा रायगडाच्या महादरवाजाला लागुनच आहे. रायगडाच्या महादरवाजातून आत प्रवेश करताना उजव्या हाताला हि जागा आहे.
शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!!
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
>>> दुर्गदुर्गेश्वर रायगडावरील तोफाचा इतिहास <<<
वि.वा. जोशी यांचे १९२९ साली लिहिलेल्या 'राजधानी रायगड' या पुस्तकात रायगडावरील तोफांविषयी लिहिलेले आहे . त्यांना १४ ते १५ तोफा आढळल्या होत्या . त्यानंतर १९६२ साली शा. वि. आवळस्कर यांच्या 'रायगडाची जीवनकथा' या पुस्तकात १७ तोफांविषयी जुजबी माहिती आहे . गो. नी. दांडेकर यांनी १९६५ साली लिहिलेल्या 'शिवतीर्थ रायगड' या पुस्तकात त्यांनी रायगडावरील १५ तोफांविषयी बरीच व्यवस्थित माहिती लिहिलेली आहे . आता रायगडावर १५ तोफा दिसतात . परंतु शिवकालात बहुत तोफा असल्या पाहिजेत . बहुधा त्यातील बऱ्याचशा इंग्रजआणि पोतुगीजांकडून घेतलेल्या असाव्यात . इंग्रज-पोतुगीजा कडील तोफा चांगल्या उत्तम घडणीँच्या असतात हे शिवछत्रपतीँना माहित होते . तोफांनी सुसज्ज सैन्य समोरुन चालून येत असतां आपण रथात
बसून गदाधारी होऊन शंख फुंकण्याचा आचरटपणा त्यांनी कधीच केला नाही .शिवछत्रपतीँनी काही घडीव तोफां इथेच तयार करण्याचा प्रयत्न करुन पाहिला . कडीमागेँ कडीँ ठोकून रचलेल्या तोफा म्हणजे भारतीयांच्या शस्त्ररचना शास्त्रातील अथक प्रयत्नांचे प्रत्यंतरच आहे . या जातीची एक लहानगी तोफ
नगारखान्या समोरुन कुशावर्ताकडे उतरत असतां डाव्या हातस पडलेली होती . (ती आज होळीच्या माळावरील शिवछत्रपतीँच्यामुर्तीपाशी रचून ठेवण्यात आली आहे ) पण अशा तोफा रचीत बसणेँ हे मोठे कष्टदायक काम होते . आणि पुन्हा त्यांची घडण सफाईदार होत नसेच . तेव्हा शिवछत्रपतीँनी अनेक तोफा खरेदी केल्या . अशी अनेकपत्रे उपलब्ध आहेत . त्यात पितळी तोफाही शिवरायांनी मागितल्याची नोँद आहेत .(पहा शिवकालिन पत्र सार खंड १ व २ )
त्या तोफा मोठ्या यत्नांने रायगडावर आणून मांडल्या .महाद्वारा शेजारचे सगळे बुरुज , वाघ दरवाजाचा बुरु�� - दरवाजाचा बुरुज ,हिरकणी बुरुज खुबलढा बुरुज , मशीद मोर्चा इ. अनेक लढाव ठिकाणेँ त्या काळी बुलंद तोफांनी सुसज्ज ठेवल्या असतील .शिवछत्रपतीँ आणि शंभूराजांच्या निधनांनतर जेव्हा गड
सिद्दीकडे होता . तेव्हा त्याने नक्कीच गडांवरील काही उमद्या तोफा जंजिऱ्यावर पळविल्या असाव्यात . कदाचित आज ज्या तोफा जंजिरा किल्ल्यांवर आहेत
त्यापैकी काहीँ रायगडावरील असाव्यात . या तोफांची व्यवस्था मोठी उत्तम ठेवली जात असे . पावसाळ्यात त्या गंजू नये म्हणून त्यांच्यावर निर्गुडीच्या डाहाळ्यांचे छप्पर घालीत . त्यांच्या कानात मेण भरुन ठेवीत . सर्दाव्यामुळे त्या खराब होऊ नयेत म्हणून त्या मधून मधून उडवून लावले जाई .
इ.स. १८१३ -१४ मध्ये रायगडावर १७ तोफा होत्या अशी नोँद पेशवे दप्तरात सापडते त्यांची नावे पुढील प्रमाणे होती -
१) गंगासागर २) मुलना ३) पेरुजंगी ४) भुजंग ५) रामचंगी ६)फत्तेलष्कर ७) पद्मीण ८) फत्तेजंग ९) सुंदर १०) रेकम ११)मुंगसी १२) शिवप्रसाद १३) गणेशबार १४) भवानी १५)चांदणी १६) लांडाकसाब १७) नागीण आज गडावर या पैकी १५ तोफा इथेँ तिथेँ पडलेल्या आहेत .
काही मातीत गाडल्या गेलेल्या आहेत . कुठल्या तोफेचे काय
नाव हे कळायला आज काहीच मार्ग नाही . यापैकी मशीद मोर्चा जवळची १ , महादरवाज्या जवळच्या २ तोफा , हिरकणी बुरुजाजवळच्या ३ , होळीच्या माळावरीलशिवछत्रपतीँच्यामुर्ती शेजारच्या २ लहान तोफा . एवढ्याच बहुतेकांना ठाऊक आहेत .आता तुम्हांला सर्व १५ तोफा कुठे कुठे आहे हे दाखवतो .
वरील ८ तोफा सर्वश्रुत आहेच . उरलेल्या ७ तोफांपैकी ३ तोफा महादरवाजा ते टकमकावरील तिसऱ्या बुरुजांवर आणि पाचव्या बुरुजावर आहेत . त्यापैकी एका मोठ्या तोफावर निशाण आणि 25-3-0 अशी इंग्रजी आकडे कोरलेले आहे .२ तोफा महादरवाज्या ते हिरकणी या टप्प्यांमधील बुरुजांवर प्प्प्प्यांमधील बुरुजांवरआहेत . एक झाडीत पडलेली आहे तर दुसरी मातीत गाडली गेलीय . हिरकणी बुरुजाच्या उजवीकडे खाली झाडीत पडलेल्या आहेत . या झाल्या रायगडावरील तोफा . १ मोठी तोफ रायगडवाडीत मारुतीच्या मंदिराशेजारी तिथल्या गावकऱ्यांनी चौथरा रचून ठेवली आहे . त्या शेजारीच काही दगडी गोळे आहेत . नीट धमधमे रचून त्यावर या तोफा व्यवस्थितपणे ठेवण्याची गरज आहे.
शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!!
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
दुर्गदुर्गेश्वर रायगडाची अभेद्य अशी तटबंदी…!!!
महादरवाजा हा बालेकील्ल्याखाली सुमारे एक तृतीयांश अंतरावर आहे. शिवाजी महाराजांच्या बांधणीचे हे वैशिष्ट्य आहे.
महादरवाजाखाली दीड-दोनशे फुट अवघड चढ आहे.शत्रू दरवाजापर्यंत येईपर्यंत दमावा,अशी योजना केली आहे.या बाजूला गडाला मोठी तटबंदी आहे,मूळ तटबंदीच्या बाहेर एक वेगळीच तटबंदी बांधून गड फार मजबूत केला आहे.हि तटबंदी पार 'टकमक' टोकापर्यंत पसरत गेली आहे.त्यात एक चोरदरवाजा आहे आणि एक महादरवाजा आहे.महादरवाजा बेचक्यात आहे.दोन प्रचंड बुरुज त्याचे रक्षण करतात.अशा बांधणीला जीभी म्हणतात. या बांधनिबद्दल रायगडाला इसवी सन १६७३ साली भेट देणारा टोमास निक्ल्सने लिहिले आहे. वाटेत पायरया खोदल्या आहेत.दरवाजाजवळ पायरया पक्क्या खडकात खोदल्या आहेत.जेथे टेकडीस नैसर्गिक अभेद्यता नाही,तेथे २४ फुट उंचीचा तट बांधला आहे.चाळीस फुटांवर दुसरी तटबंदी बांधून किल्ला इतका अभेद्य बनवला आहे कि,अन्नाचा पुरेसा पुरवठा असल्यास अल्प शिबंदीच्या सहाय्याने तो सर्व जगाविरुद्ध लढू शकेल..!!! कड्याच्या टोकावर बांधलेली महादरवाजाची तटबंदी रायगडाला अभेद्य बनवते.शिवाजीराजांनी दुर्गबांधणीची कला आत्मसात केली होती.तटबंदीसाठी निवडलेली जागा अत्यंत उत्तम आहे.काही किलोमीटर्स लांबीची राजगडाची तटबंदी हे त्याचे,तर फक्त दीड-दोनशे मीटर्स लांब रायगडाची तटबंदी हे त्याचे वैशिष्टआहे.
शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!!
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
दुर्गदुर्गेश्वर रायगडावरील " हत्ती तलाव "…!!!
महादरवाज्यातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो, तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणार्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता.या तलावाच्या तळाला दरीच्या दिशेला एक दगड बसविलेला होता. उन्हाळ्याच्या शेवटी हा दगड काढून तलाव रिकामा करून साफ केला जात असे. आज हा दगड नसल्यामुळे तलावात पाणी साठत नाही.
शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!!
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
दुर्गदुर्गेश्वर रायगडावरील " शिर्काई देऊळ "…!!!
महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिर्काईचे देऊळ. शिर्काई ही गडावरील मुख्य देवता. शिर्के पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गड्स्वमिनी श्री शिरकाई मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात मावळंकर नावाच्या इंजिनिअर ने हे मंदिर बांधले आहे. ते श्री शिरकाई चे मूळ मंदिर नाही. मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते. तेथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. ब्रिटीश काळापासून तेथे श्री शिरकाई चा घरटा हा नामफलक होता.
शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!!
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ll श्री शिवचरणाप्रणमस्तु ll
जगदवंदनीय, विश्वभुषण छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !!
शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!!
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा पेज आहे. फक्त एकदा या पेज भेट द्या__/\__
https://www.facebook.com/
_________________________________________________________________________________
दुर्गदुर्गेश्वर रायगडावरील भव्य अशी " बाजारपेठ "…!!!
होळीच्या माळावर ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे. त्या समोर जी विस्तीर्ण अशी वास्तू दिसते ती बाजारपेठ होय. बाजारपेठ ही दोन रांगेमध्ये विभाजित झालेली आहे. बाजारपेठेच्या दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत, मधून जवळजवळ चाळीस फूट रुंद रस्ता आहे.
शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!!
होळीच्या माळावर ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे. त्या समोर जी विस्तीर्ण अशी वास्तू दिसते ती बाजारपेठ होय. बाजारपेठ ही दोन रांगेमध्ये विभाजित झालेली आहे. बाजारपेठेच्या दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत, मधून जवळजवळ चाळीस फूट रुंद रस्ता आहे.
शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!!
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा पेज आहे. फक्त एकदा या पेज भेट द्या__/\__
https://www.facebook.com/MAZASAHYADRIMAZAABHIMAN
https://www.facebook.com/MAZASAHYADRIMAZAABHIMAN
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
दुर्गदुर्गेश्वर रायगडावरील " जगदीश्वराचे मंदिर "…!!!
बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर आहे. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे, पण सध्या ही मूर्ती भग्नावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभार्याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते.

दुर्गदुर्गेश्वर रायगडावरील " जगदीश्वराचे शिवलिंग "…!!!
कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुकुटी झळाळी ,
कारुण्य सिंधू भवदुख हरी तुजविण शंभो मज कोण तारी||
ll जय जगदीश्वर ll
ll हर हर महादेव ll
शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!!
कारुण्य सिंधू भवदुख हरी तुजविण शंभो मज कोण तारी||
ll जय जगदीश्वर ll
ll हर हर महादेव ll
शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!!
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा पेज आहे. फक्त एकदा या पेज भेट द्या__/\__
https://www.facebook.com/MAZASAHYADRIMAZAABHIMAN
https://www.facebook.com/MAZASAHYADRIMAZAABHIMAN
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
"सेवेठायी तत्पर हिरोजी इंदुलकर"...!!!
हिरोजी इटाळकर (इंदुलकर) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधकाम प्रमुख होते. त्यांनी शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी रायगड चे बांधकाम अत्यंत मजबूत असे बांधले. आत्ताच्या कोणत्याही सिविल इंजिनिअर ला लाजवेल असे बांधकाम कौशल्य त्यांच्याकडे होते. ते वडार समाजाचे होते. जेव्हा सिधुदुर्ग बांधावयाचा होता तेव्हा वडार समाजातीलच सुमारे ५०० पाथरवट लोकांनी सिधुदुर्गाचे बांधकाम केले असे सभासद म्हणतो . अगदी पुरातन काळापासून वडार समाज बांधकामध्ये, दगड फोडण्यामध्ये, दगडावरील नक्षिकामामध्ये कारागीर म्हणून प्रसिद्ध होता आणि सध्याही आहे. हिरोजी इटाळकर यांचे बांधकाम कौशल्य पाहून छत्रपती शिवरायांनी त्यांना अनेक किल्ल्यांच्या बांधकामाचे काम दिले.
शिवराज्याभिषेकावेळेस खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजीस रायगडावरील इमारती, तळी, मनोरे, रस्ते, देवळे इत्यादी बांधकामे हाती दिले होते आणि त्याची जबाबदारी सोपविली होती. गड बांधण्याचे काम याने आपल्या देखरेखीखाली पूर्ण करून घेतले.त्यात त्यांनी वापी-कूप-तडाग,प्रासाद,उद्याने,राजपथ. ,स्तंभ,गजशाला,नरेंद्रसदन,बारा महाल अशा अनेक इमारती हिरोजीनी रायगडावर उभ्या केल्या. गड पाहिल्यावर छत्रपती शिवाजी राजे बेहद्द खुश झाले आणि त्यांनी हिरोजीला सांगितले की या गडावर कोणत्याही एका ठिकाणी तू तुझे नाव लिहावे आणि तुमच्या स्मृती जतन कराव्यात. म्हणूनच त्यांनी पायरीवर आपले नाव कोरले आणि त्यात लिहिले कि हिरोजी इटाळकर महाराजांच्या सदैव तत्पर सेवेमध्येच असेल.त्या पायरीचा फोटोही इथे देत आहोत.
या आपल्या शिलालेखात त्यांनी "सेवेठायी तत्पर हिरोजी इंदुलकर…. … " असे म्हणून आपण महाराजांचे निस्सीम भक्त आणि सेवक आहोत हेच दाखवून दिले.

श्री जगदीश्वराचे दर्शन घेऊन समोर जो दरवाजा लागतो. या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो तो पुढीलप्रमाणे:
श्री गणपतये नम: ।
प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनुज्ञया
श्रीमच्छत्रपते शिवस्यनृपते सिंहासने तिष्ठत:।
शाके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे
ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ।।१।।
वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ
स्तभे कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते ।
श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो
यावन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ।।२।।

याचा थोडक्यात अर्थ पुढीलप्रमाणे,
’सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमद् छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे आशांची उभारणी केली आहे, ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो.’
शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!!
’सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमद् छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे आशांची उभारणी केली आहे, ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो.’
शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!!
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा पेज आहे. फक्त एकदा या पेज भेट द्या__/\__
https://www.facebook.com/MAZASAHYADRIMAZAABHIMAN
https://www.facebook.com/MAZASAHYADRIMAZAABHIMAN
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
दुर्गदुर्गेश्वर रायगडावरील छत्रपती शिवरायांची समाधी :-
मंदिराच्या पूर्व दरवाजा पासून थोड्या अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच " महाराजांची समाधी "…!!!
’क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके १६०२ चैत्र शुद्ध १५ या दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्याणी बांधिलेला जगदीश्वराचा जो प्रासाद त्याच्या महाद्वाराच्या बाहेर दक्षणभागी केले, तेथे काळ्या दगडाच्या चिर्याचे जोते अष्टकोनी सुमारे छातीभर उंचीचे बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीच्या खाली पोकळी आहे, तीत महाराजांचा अवशिष्टांश रक्षामिश्र मृत्तिकारुपाने सापडतो.’
दहनभूमी पलीकडे भग्न इमारतींच्या अवशेषांची एक रांग आहे, ते शिबंदीचे निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इ.स. १६७४ मध्ये इंग्रज वकील हेन्री ऑक्झेंडन यास राहावयास दिले होते. महाराजांच्या समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे. तर उजवीकडे दारूची कोठारे, बारा टाकी दिसतात.
शिवदुर्गांचे पावित्र्य राखा, राष्ट्राभिमान जोपासा…!!!
PHOTOGRAPHY & CALLIGRAPHY BY : Atul Vijay Chavan

घासल्या तलवारी आम्ही या फौलादी छातीवर.....
गर्वच नाही तर माज आहे या मराठ्याच्यां जातीवर......
गनीमाला भित नाही विश्वास आहे तलवारीच्या पातीवर......
फितुर जळतात पाहुन आमच्या वाघाच्या कातीवर......
लोळवीले षडं पाजले पाणी याच स्वराज्याच्या मातीवर......
आमची निष्ठा` प्रतिष्ठा` मान` मर्यादा` स्वाभिमान` अभिमान` फक्त
आणि फक्त ``श्री शिव छत्रपति`` वर...!!!
जगदवंदनीय, विश्वभुषण छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !!
शिवदुर्गांचे पावित्र्य राखा, राष्ट्राभिमान जोपासा…!!
PHOTOGRAPHY BY : Atul Vijay Chavan

अप्रतिम ..
ReplyDeleteशिव छत्रपती महाराज कि जय
जयोस्तु हिंदुस्तान
छान छायाचित्रण आहे ....
ReplyDeleteआपल्या कडील काही इमेजेस हव्यात .....
मिळतील का ?
गणेशोत्सवासाठी