JEJURI FORT-- JAY MALHAAR...सोन्याची जेजुरी…!!!


बोला " येळकोट येळकोट जय मल्हार "…!!!
देवा सदानंदाचा येळकोट…!!!
मल्हारी मार्तंड जय मल्हार…!!!
Photography By--- Atul Vijay Chavan
शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!!
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा पेज आहे. फक्त एकदा या पेजला भेट द्या__/\__
https://www.facebook.com/MAZASAHYADRIMAZAABHIMAN

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सोन्याची जेजुरी…!!!
श्री क्षेत्र जेजुरी सह्याद्री च्या कुशीत वसलेले गाव साक्षात मल्हारीच येथे नांदतो आहे.श्री शंकराने मार्तंड भैरव अवतार इथेच धारण केला. दक्षिणे मध्ये मणि मल्लाचा संहार केल्या नंतर आपली राजधानी ही येथेच वसवली. मार्तंड भैरवाच्या मुळ अवतार ठिकाणाला म्हणजेच सह्याद्री च्या या डोंगररागांना जयाद्री नाव लाभले. आणि काळाचे ओंघात त्याचे जेजुरी झाले.
या मल्हारीस हळद प्रिय म्हणून येथे येणारा प्रत्येक भक्त मुक्त हाताने हळदचूर्ण उधळीत असतो, उत्सवा मध्ये तर सारा आसमंत व परिसर भंडाराने सुवर्णमय होतो म्हणूनच जेजुरीला सुवर्णनगरी म्हटले जाते.
महाराष्ट्रात खंडोबा कर्नाटकात मैंलार, आंध्रप्रदेश मध्ये मल्लाना, नावाने प्रसिद्ध असलेल्या या देवताच्या भक्तीत राजापासून रंका पर्यंत, रावापासून अंतजा पर्यंत सर्वजण लीन झाले. अंतजाचा श्रद्धेय असलेल्या या देवताने सर्व जाती-धर्म, उच्च-निच्च, भाषा-प्रदेश यांच्या भिंती तोडून सर्वाना आपल्या भक्तीत सामावून घेतले असा हा खरा लोकदेव.
खंडोबा हे शोर्याची स्पुर्ती देणारी देवता यांच्या स्पुर्तीतून अनेक शूरवीर जन्माला आले. स्वराज संस्थापक छत्रपती शिवरायांनी आपली तलवार रणात शत्रूच्या रक्तात प्रथम भिजवली ती याच क्र्र्हेपठारचे परिसरात. सरदार मल्हारराव होळकर यानी स्वराज्याचा ध्वज उत्तरेत फडकवला, तो या खंडेरायाच्या श्रद्धेच्या बळावरच आणि स्वातंत्र्यासाठी पहिले बंड उमाजी नाईकाने उभे केले तेही याच क्र्र्हेपठार परिसरात.
अनेंक राजघराणी, सरदार, सामान्य गोरगरीब भक्त यांच्या श्रद्धेतून या परिसरात शेकडो वर्ष अनेंक वास्तु, मंदिरे, लोकाभिमुख सुविधा देणारे तलाव, बाग, धर्मशाळा, पुष्करणी अशा अनेक कलाकृती निर्माण झाल्या अनेकांचे पुनर्निर्माण हि झाले यातील होळकरांचे योगदान बहुआयामी होते.मराठी कलेचा,संस्कृतीचा व वेभवाचा वारसा लाभलेल्या या वास्तु त्या मधूनच उभ्या राहिल्या या निर्मिती मध्ये कला होती श्रद्धा होती आणि भाविकांच्या साठी सुविधा निर्माण करण्याची दृष्टी होती. अनेक लोककला जनश्रुती आणि लोकपरंपरांची हि एतिह्यासिक नगरी इतिहासा बरोबरच निसर्गाने या भूमीवर आपला वरदहस्त ठेवला अनेक प्राणी, पक्षी वनस्पती यांची जैवविविधता लाभलेला हा परिसर अनेक लोककला व कलाकारांना या भुमीने जन्म दिला. त्यांनी आपल्या कलागुणांनी रसिकांची मने जिंकली .
जेजुरी बरोबरच येथील आसपासचा परिसर देखील असाच समृद्ध वारसा सांगणारा मंदिरे, किल्ले, यांनी नटलेला आणि इतिहासाचा साक्षीदार असणारा. खंडोबा, दक्षिण भारताचा लोकदेव त्याच्या भक्तांना जेजुरी प्रमाणेच त्याच्या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश भर पसरलेल्या मंदिरांचे ही आकर्षण या सर्व विषयांना समावून घेऊन त्याची अभ्यास पूर्ण माहिती देणारे या महाजाला वरील हे आद्य संकेतस्थळ येथील माहिती विविध विभागाचे माध्यमातून देण्यात आलेली आहे.
Photography & Calligraphy By--- Atul Vijay Chavan
शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!!
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा पेज आहे. फक्त एकदा या पेजला भेट द्या__/\__
https://www.facebook.com/MAZASAHYADRIMAZAABHIMAN

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------



वाघ्या- मुरळी...!!!
महाराष्ट्राच्या आदर्श परंपरेत भर घालणार्‍या अनेक लोककला जनजीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या आहेत. पण या कलांमध्ये जेव्हा अंधश्रद्धेतून मानवी जीवनावर होणारा अन्याय डोकावतो, तेव्हा भारावून सोडणार्‍या काही कलांच्या मुळाशी असणारा अन्यायकारक विचार मनाला टोचू लागतो. ‘वाघ्या-मुरळी’ हे लोककलावंत मनात असेच प्रश्नांचा डोंगर उभा करतात.
वाघ्या आणि मुरळी ही जोडी खंडोबाची उपासना करण्यासाठी आयुष्य वेचते. नवलाख पायरीच्या वर असणार्‍या या जेजुरीच्या खंडोबाचं गुणगान गावोगावी घरोघरी भक्तिभावानं केलं जातं आणि याच भक्तीचा एक भाग म्हणून वाघ्या-मुरळीला बोलावून देवाचं जागरण घातलं जातं. महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्वच खेड्यांमध्ये हा कुळाचार पाळला जातो.
वाघ्या मुरळीचा जन्म -
लग्नानंतर लवकर अपत्य होत नसल्यास आई-वडील खंडोबाला अशी प्रार्थना करतात की, आम्हाला मूल झाल्यास पहिलं मूल आम्ही तुझ्या भक्तीसाठी अर्पण करू. हा नवस बोलून जर त्यांना मूल झालं, तर ते पहिलं मूल ते विधिवत देवाला सोडतात. (वास्तविक नवसाने मूल होत नाही आणि काही कारणानं मूल झालं, तरी आपल्या वांझपणाचा कलंक पुसण्यासाठी कोवळ्या जीवाच्या जीवनाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही.)
देवाला सोडलेला मुलगा वाघ्या होतो आणि मुलगी मुरळी होते.
वाघ्या किंवा मुरळी सोडण्याचा एक ठरावीक विधी असतो. नवस बोलणारे आई-वडील चैत्र महिन्यात नवस पूर्ण करण्याचा मनोदय विशिष्ट अशा देवस्थानाच्या गुरवाला (पुजार्‍याला) कळवतात. त्यानंतर एक तारीख व वेळ नक्की केली जाते, त्या दिवशी मुलाला / मुलीला वाजत-गाजत देवळात आणले जाते. खंडोबाच्या साक्षीने मुलाच्या गळ्यात वाघाच्या कातड्याची भंडार्‍याची पिशवी अडकविली जाते व देवाला त्या मुलाचा स्वीकार करण्यासाठी साकडं घातलं जातं. देव त्या मुलाचा स्वीकार करतो हे गुरवालाच कळते व त्यानंतर ते मूल आयुष्यभरासाठी खंडोबाच्या मालकीचं होतं. पण, दुर्दैवाने वास्तवात खंडोबाच्या या भक्तांवर धनदांडग्यांचीच मालकी राहते.
खांद्यावर घोंगडं, गळ्यात वाघाच्या कातड्याची पिशवी आणि हातात घंट्यांची जोडी म्हणजेच घोळ असलेला वाघ्या रुबाबदार वाटतो. तर नऊवारी नेसून खंडोबाच्या नावाचा भंडारा कपाळावर लावणार्‍या मुरळीची चपळाई कार्यक‘मात रंगत भरते. वाघ्या-मुरळीची जागरणं शुभकार्यानंतर घरोघरी आयोजित केली जातात. हे कार्यक‘म अगदी गोंधळासारखेच असतात. गोंधळात स्त्रिया नसतात आणि इथे मुरळी (स्त्री) असते हा एक महत्त्वाचा फरक आहे.
वाघ्यांचे दोन प्रकार आहेत एक घरवाघ्या आणि दुसरा दारवाघ्या. घरवाघ्या म्हणजे खंडोबाचा नवस फेडण्यासाठी काही ठरावीक दिवशी वाघ्याचा वेश धारण करून पाच घरी जाऊन वारी मागणारे, आणि दारवाघ्या म्हणजे कायमस्वरूपी वाघ्या होण्याची दीक्षा घेतलेले.
‘वाघ्या’ या पात्राविषयी आणि त्याच्या नावाविषयी अभ्यासकांमध्ये बरीच मतमतांतरे आहेत.
मुरळी तर प्रथमपासूनच टीकेचं लक्ष झाली आहे. अगदी संत एकनाथांनीही -
‘इच्छामुरळीस पाहूं नका, पडाल नरकद्वारी।।’
असा उपदेश केला आहे. म्हणजेच मुरळी हे मायाजालाचं प्रतीक म्हणून संबोधली गेली आहे.
संत शेख महंमद बाबा तर कोणताही आडपडदा न ठेवता पुढील काव्यातून आपले मत व्यक्त करतात.
‘पुण्य आचरण न ये मुरळीच्या चित्ता। भलत्याच्या होतील कांता।
त्यांचा हात भाळास लावितां। कोण तरला सांग बा।।’
मुळात मुरळी हे पात्रच असं आहे. तिच्या भक्तीची जातकुळी आणि तिचं देवाशी असणारं नातंच असं आहे की ऐकणार्‍याला व बघणार्‍याला ते विचित्र वाटावं. तिच्या भक्तीतली ओढ आणि तिची भूमिका मांडणारं हे गीत तिला अधिक स्पष्ट करतं -
वय सोळा, कोवळी काया, हूडपणात घुंगरु पाया,
लागे नाचाया, लागे नाचाया, लागे नाचाया,
पोर बावरी झाली पहा, जेजुरीला जाया।।
नव्या नव्या वार्‍याने, हिचे भारावले अंग,
या अशा वयांतच बदलू पाहे ढंग,
उतावीळ मल्हारीसंगे लगीन लावाया।।
एकूणच थोडीशी वेगळ्या धाटणीची वाटणारी ही भक्ती महाराष्ट्राच्या लोकजीवनातील चैतन्य होऊन राहिली आहे. हे चैतन्य काही अन्यायी विचारांच्या पायावर उभे आहे हे दुर्दैव! पण त्यातही सुधारणा होते आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी प्रामुख्याने मुरळींबाबतच्या समस्या प्रथम समाजासमोर मांडल्या. सरकारने मुरळी होण्यावर बंदी घातली आहे. तुणतुणं, खंजिरी आणि घोळाच्या तालावर
मुख दाऊन बानू गेली ।
स्वारी देवाची ग वेडी झाली जी ।।
हा खंडोबाचा जागर ऐकत, कलेच्या निकोप दृष्टीने आपण ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ म्हणत वाघ्या-मुरळीच्या गीतांना साद नक्कीच देऊ शकतो.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जेजुरी गडावरील " आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक " यांची तेजस्वी मूर्ती…!!!
>>> आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक <<<
मराठेशाहीतील उत्तरार्धात पेशवाई बुडाल्यानंतर हिंदुस्थानावर इंग्रजांचा अंमल सुरु झाला तेव्हा श्रीखंडोबा भक्त उमाजी नाईकने इंग्रजी सत्तेविरुद्ध पहिले बंड पुकारले म्हणून त्यांला आद्य क्रांतिवीर असे म्हणतात. छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी गनिमी काव्याने लढत इंग्रजांशी झुंज दिली. नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर किल्ल्याची रखवाली करीत असलेल्या रामोशी-बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या भिवडी गावामध्ये झाला. उमाजी जन्मापासूनच हुशार,चंचल,शरीराने धडधाकट,उंचपुरा,करारी त्यामुळे त्याने पारंपारिक रामोशी हेरकला लवकरच आत्मसात केली होती.जसा उमाजी मोठा होत गेला तसा त्याने दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाते, कु-हाडी, तीरकामठ, गोफणी चालवण्याची कला अवगत केली. या काळात इंग्रजांनी हिंदुस्तानात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरवात केली. हळू हळू मराठी मुलुख हि जिंकत पुणे ताब्यात घेतले. १८०३ मध्ये पुण्यात दुस-या बाजीराव पेशव्यास स्थानपन्न केले आणि त्याने इंग्रजी पाल्य म्हणून काम सुरु केले. सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्याप्रमाणे पुरंदर किल्ल्याचे संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले. त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली. जनतेवर इंग्रजी आत्त्याचार वाढू लागले. अशा परिस्थतीत करारी उमाजी बेभान झाला. छत्रपती शिवरायांना श्रद्धा स्फूर्तीचे स्थान देत त्याने त्यांचा आदर्श घेऊन स्वताच्या आधीपात्त्याखालील स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठुजी नाईक, कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोळंसकर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्रीखंडेरायला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली. इंग्रज, सावकार, मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरवात केली. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार, अन्याय झालाच तर तो भावासारखा धावून जाऊ लागला. इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमाजीला १८१८ ला एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सरकारने दिली. परंतु तो काळ सत्कारणी लावत त्याने त्याकाळात लिहिणे वाचणे शिकले. आणि सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धच्या कारवाया आणखी वाढवल्या. उमाजी देशासाठी लढत असल्याने जनताही त्याला साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटिला आले. उमाजीला पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मॉकिनटोष याने क-हेपठारच्या मामलेदारास फर्मान सोडले. मामलेदार इंग्रज सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला. उमाजीने पाच इंग्रज सैन्याची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली. त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले. उमाजीचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असत एका टोळीत जवळ जवळ पाच हजार सैन्य होते. १८२४ ला उमाजीने भांबुर्डा येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेला वाटला होता. ३० नोव्हेंबर १८२७ ला इंग्रजांना त्याने ठणकावून सांगितले कि,आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंड सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील,फक्त इशारा देऊन न थांबता त्याने इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले.२१ डिसेंबर १८३० ला उमाजीनी आपला पाठलाग करणा-या इंग्रज अधिकारी बोईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका, गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते.आणि काहीचे प्राण घेतले होते. १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच त्याने प्रसिद्ध केला त्यात नमूद केले होते,इंग्रजी नोक-या सोडाव्यात. देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत, इंग्रजांना शेतसारा,पट्टी देऊ नये. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल. असे सांगून एकप्रकारे त्याने स्वराज्याचा पुकारच केला होता. तेंव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला. या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले आणि त्यांनी उमाजीला पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला. मोठे सावकार,वतनदार यांना आमिषे दाखवण्यात आली उमाजीच्या सैन्यातील काहीना फितूर करण्यात आले.त्यातच उमाजीने एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून हात कलम केलेला काळोजी नाईक इंग्रजांना जाऊन मिळाला. इंग्रजांनी उमजीची माहिती देणा-यास १० हजार रुपये आणि चारशे बिघे जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली. तसेच नाना चव्हाण हि फितूर झाला आणि त्यांनी उमाजीची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली. १५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजीला इंग्रजांनी पकडले. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत ठेवण्यात आले अशा या खोलीत उमाजी असताना त्याला पकडणारा इंग्रज अधिकारी मॉकिनटोष दररोज महिनाभर त्याची माहिती घेत होता. त्यानेच उमाजीची सर्व माहिती लिहून ठेवली. नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर याने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. ३ फेब्रुवारी १८३२ ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाईक हसत हसत फासावर चढला. अशा या उमाजीचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते. 
Photography By--- Atul Vijay Chavan
शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!!
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा पेज आहे. फक्त एकदा या पेजला भेट द्या__/\__
https://www.facebook.com/MAZASAHYADRIMAZAABHIMAN

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

"श्री बाणाई माता " जेजुरीपती श्री खंडेरायाची अर्धभार्या…!!!
मार्तंड भैरवाने बाणाई सोबत विवाह केला व चोरून तिला जेजुरगडावर तळघरामध्ये आणून ठेविले होते.तेथून ते महाशिवरात्रीला प्रकट झाले.अशी कथा गुप्त मल्लेश्वराविषयी "मार्तंड विजय" ग्रंथात सांगितली आहे. मुख्य मंदिरातील गर्भगृहा
मध्ये उजवीकडे व डावीकडे दोन खोल्या आहेत त्यापैकी डावीकडील खोलीत देवाचे शेजघर आहे तर उजवीकडील खोली बाहेरून रिकामी दिसते परंतु या खोलीमध्ये तळघर असून या तळघरामध्ये श्रीखंडोबा व बाणाईचे स्वयंभू लिंग आहे. हे गुप्तलिंग वर्षातून फक्त एकदाच महाशिवरात्री उत्सवामध्ये उघडले जाते एरवी ते बंदच असते. असेच एक लिंग शिखरामध्ये आहे तेसुद्धा महाशिवरात्रीलाच उघडते.
महाशिवरात्रीला जेजुरी येथे आल्यानंतर पाताळलोक, भूलोक व स्वर्गलोक या त्रैलोक्यामध्ये व्यापलेल्या परमेश्वराचे लिंगरूपाने दर्शन होते अशी भाविकांची श्रद्धा आहे.
शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!!
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा पेज आहे. फक्त एकदा या पेजला भेट द्या__/\__
https://www.facebook.com/MAZASAHYADRIMAZAABHIMAN

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

" हेगडी प्रधान " कैलासपती श्री खंडोबारायाचे प्रधानमंत्री…!!!
>>> हेगडी प्रधान <<<
मणीसूर व मल्लासूर या दैत्यांच्या युद्धावेळी मार्तंड भैरवाने विष्णुना आपले प्रधान म्हणून नेमले होते व मणीसूर दैत्य धारातीर्थी पडल्यानंतर त्याने केलेल्या स्तुतीमुळे मार्तंड भैरव प्रसन्न झाले व त्यांनी विष्णुना देवसेनेतर्फे मल्लासूराकडे शिष्टाई करण्यासाठी पाठविले होते. विष्णूनी केलेल्या शिष्टाईला यश आले नाही. पुढे युद्धामध्ये मार्तंड भैरवाचे हातून मल्लासूराचा संहार झाला.विष्णूंचे अर्थात हेगडी प्रधानाचे मंदिर जेजुरगडावरील पायरी मार्गाच्या मध्यावर लागते.मंदिर साध्या बांधणीचे विना कळसाचे दगडामध्ये बांधलेले आहे. या मंदिरामध्ये विष्णूंच्या दोन मूर्ती आहेत त्यावरून अनेकांना वाटते हेगडे व प्रधान दोन स्वतंत्र असावेत परंतु सत्यात प्रधान या शब्दाचे कानडी रूप म्हणजे हेगडे होय. ज्याप्रमाणे चांगभलं हे एकाच अर्थाच्या दोन शब्दांचे एकत्रीकरण करून त्यांचा एकच शब्द रूढ झाला आहे तसेच हेगडे प्रधान यांचे बाबतीत हेगडी प्रधान हे नामाभिधान प्राप्त झाले आहे. श्रीखंडोबा म्हाळसाईचे दर्शन घेण्यापूर्वी हेगडी प्रधानाचे दर्शन घेणे महत्वाचे मानले जाते.
Photography By--- Atul Vijay Chavan
शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!!
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा पेज आहे. फक्त एकदा या पेजला भेट द्या__/\__
https://www.facebook.com/MAZASAHYADRIMAZAABHIMAN

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जेजुरी गडावरील " छत्रपती शिवराय आणि छत्रपती शहाजी राजांची " अविस्मरणीय भेट…!!!
वेरूळ गावचे पाटील असलेले भोसले घराणे मालोजी राजे भोसल्यांना पुणे व सुपे परगण्याची जहागिरी मिळाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित झाले.तेव्हा पासून क-हेपठारच आणि भोसल्यांच अतूट नाते आहे. जेजुरी व श्रीखंडोबा संदर्भात उपलब्ध कागदपत्रांवरून भोसले घराण्याचा घेतलेला धावता आढावा.…!!!
मालोजीराजांची पुणे व सुपे परगण्याची जहागिरी त्यांच्या मृत्यू नंतर वयाच्या पाचव्या वर्षी शहाजी राजांना मिळाली व आपले काका विठोजीराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची कारकीर्द फुलू लागली. पुढील काळामध्ये पराक्रमी शहाजीराजांनी निजामशाही किंवा आदिलशाहीमध्ये स्वकर्तुत्वावर जहागिरी मिळवली व टिकवली होती सुपे परगण्याची जहागिरी बहुतांश काळ त्यांचेकडेच असल्याने क-हेपठारावर त्यांचा नेहमीच वावर होता. जिजाऊ मासाहेब व शिवराय यांचेकडे पुणे प्रांतातील कारभार सोपविल्यानंतर त्यंचा मुक्काम अखेर पर्यंत बंगरूळलाच होता.'
चिटणीसाची बखर' मधील वर्णनानुसार शिवाजी महाराजांची व शहाजी राजांची ऐतिहासिक भेट जेजुरगडावर झाली होती. याभेटीचे वर्णन करताना बखरकार म्हणतो ही भेट ब-याच कालावधीनंतर होत असल्याने प्रत्यक्ष समोरासमोर उरभेट होण्यापूर्वी कास्याच्या परातीमधील तुपामध्ये मुखदर्शन घेऊन मगच प्रत्यक्ष भेट घेतली. या ऐतिहासिक भेटीचे समूहशिल्प जेजुरगडावर नव्याने उभे रहात आहे.
Photography By--- Atul Vijay Chavan
शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!!
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा पेज आहे. फक्त एकदा या पेजला भेट द्या__/\__
https://www.facebook.com/MAZASAHYADRIMAZAABHIMAN

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------



स्वराज्यसंकल्पक आणि स्वराज्य निर्माता…!!!
मानाचा मुजरा या दोन युगपुरुष यांना…!!!
Photography By- Atul Vijay Chavan
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जेजुरीगडाच्या बालेकिल्ल्याचा " महादरवाजा "…!!!
आणि या महादरवाजा च्या शिरावर हवेच्या झोक्यावर फडकणारा " भगवा जरीपटका "…!!!
Photography By--- Atul Vijay Chavan
शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!!
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा पेज आहे. फक्त एकदा या पेजला भेट द्या__/\__
https://www.facebook.com/MAZASAHYADRIMAZAABHIMAN
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जेजुरीगडावरील "मल्हासुराचा पुतळा "…!!!
याच मल्हासुराचा वध करण्यासाठी देवा खंडेरायाने मार्तंड भैरव अवतार धारण केला होता…!!!
मार्तंड भैरव स्वतः युद्धामध्ये उतरले मल्लसुराशी सर्व शस्त्र व अस्त्रांसह महायुद्ध झाले.बराचवेळ चाललेल्या युद्धामध्ये कोणीही माघार घेत नव्हते पराक्रमी मल्लासूराने आपले सर्व कौशल्य पणाला लावले पण त्याचा काही उपयोग झाला नाही शेवटी मार्तंड भैरवाने खड्ग हाती घेऊन त्याचा घाव वर्मी घातला व मल्लासूराला भूमीवर पाडले आपला अंतकाळ जवळ आल्याचे पाहून दैत्याने मार्तंड भैरवाचे चरण धरले व देवस्तुती करू लागला त्याबरोबरच श्रेष्ठ अशी मानसपूजा हि आरंभिली, या सर्व प्रकाराने मार्तंड भैरव मनी संतोषले व त्याला वरदान मागण्यास सांगितले. यावर तो म्हणाला " हे प्रभो माझे नाव तुमच्या नावापूर्वी यावे आणि माझे शीर सदैव आपल्या चरणतळी निरंतर असावे." मणीसूर व मल्लासूर दैत्यांना पाताळात धाडल्या नंतर मार्तंड भैरावांनी 'प्रस्थपीठ' जवळील टेकडीवर आपली राजधानी स्थापन केली. दैत्यांवरील जय मिळवल्यामुळे या पर्वताला 'जयाद्री' नाम मिळाले.दैत्यासूरांचा संहार करण्यासाठी खड्ग अर्थात खंडा हाती घेतला म्हणून खंडोबा तर म्हाळसेचा पती म्हणून म्हाळसाकांत भाविक भक्तांना सदैव आनंद देणारा असा सदानंद …!!!
Photography By--- Atul Vijay Chavan
शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!!
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा पेज आहे. फक्त एकदा या पेजला भेट द्या__/\__
https://www.facebook.com/MAZASAHYADRIMAZAABHIMAN

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

देवा खंडोबारायाची पालखी…!!!
कोण कोण घेणार ही पालखी आपल्या खांद्यावर…??? 
Photography By--- Atul Vijay Chavan
शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!!
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा पेज आहे. फक्त एकदा या पेजला भेट द्या__/\__
https://www.facebook.com/MAZASAHYADRIMAZAABHIMAN

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जेजुरी गडावरील श्री खंडोबारायाचे परम भक्त " नंदी ( नंदेश्वर ) "…!!!
जैसे खंडोबाराय हळदी ने भरलेले असतात तैसेच नंदेश्वर सुद्धा…!!!
देव महादेवाचे आणि नंदेश्वर यांचे नाते अतूट आहे…!!! 
म्हणून म्हटले जाते ना , कि देवा महादेवाना जर प्रसन्न करायचे असेल तर पहिले नंदी ला सांगावे…!!!
Photography By--- Atul Vijay Chavan
शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!!
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा पेज आहे. फक्त एकदा या पेजला भेट द्या__/\__
https://www.facebook.com/MAZASAHYADRIMAZAABHIMAN
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

याला म्हणतात " प्रचंड इच्छाशक्ती "…!!!
मुखी, ध्यानी मनी देवा खंडोबाचा जयजयकार करत…!!! देवा खंडोबाच्या नावाचा जयघोष करत…!!! यळकोट यळकोट जय मल्हार म्हणत…!!!
जेजुरीपती श्री खंडोबारायाचे दर्शन घेण्यासाठी आलेले एक वयोरुद्ध बाबा…!!!
या बाबान चे वय असावे सुमारे ६५ वर्षाच्या वर. पण म्हणतात ना जर तुमची इच्छाशक्ती प्रचंड असेल तर तुम्ही काहीही करू शकता ते हेच.
Photography By--- Atul Vijay Chavan
शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!!
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा पेज आहे. फक्त एकदा या पेजला भेट द्या__/\__
https://www.facebook.com/MAZASAHYADRIMAZAABHIMAN
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अगड धूम नगारा, सोन्याची जेजुरी…!!!
Photography By--- Atul vijay chavan
श्रीक्षेत्र जेजुरीचा कुलस्वामी खंडेराया म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत, रंकापासून रावांपर्यंत सर्वांच्या देवघरामध्ये पूजिला जाणारा कुलस्वामी खंडेरायाच्या जेजुरनगरीचे ऐतिहासिक महत्वही अपरंपार आहे. जेजुरीगडावर मिळणारा सर्वात जुना शिलालेख तेराव्या शतकातील आहे तर चैतन्य महाप्रभूंनी १५११ मध्ये जेजुरीला भेट दिल्याचे उल्लेख असलेले ऐतिहासिक दस्त उपलब्ध आहेत. असे अनेक शिलालेख आणि ऐतिहासिक दस्त यांमध्ये जेजुरीचा उल्लेख आढळत असला तरी विसाव्या शतकातील छायाचित्राव्यातिरिक्त जेजुरी संदर्भात चित्र उपलब्ध होत नव्हते. परंतु नुकतेच एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये रेखाटलेले जेजुरगडाचे चित्र लंडन येथील ब्रिटीश लायब्ररीच्या संग्रहामध्ये उपलब्ध असल्याची माहिती प्रथमच उजेडात आली आहे. तर दुसरे चित्र १८६२ मधील असल्याची माहिती www.jejuri.in संकेतस्थळावर प्रथमच प्रसिद्ध करण्यात आली आहे. 
त्यापैकी पहिले चित्र आहे ते १८४४ मध्ये इंग्रज चित्रकार अलेक्झांडर नाश (Nash, Alexander) यांनी जेजुरगडाचे विहंगम दृश्य वायव्येकडील होळकर तलावाच्या कडेला बसून रेखाटलेले आहे. जेजुरी गावाच्या नैऋत्य दिशेकडील डोंगरातून ओढ्याद्वारे वाहत येणा-या पाण्यावर इसवी सन १७७० मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी हा तलाव बांधला, त्या सोबतच तलावाच्या पूर्व-उत्तर बाजूस देवपूजेसाठी फुलबाग निर्माण केली तर दक्षिण बाजूस चिंचेच्या झाडांची बाग तयार केली संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्या तलावाला पाच ठिकाणांवरून खाली उतरण्यासाठी बांधीव पाय-या आहेत तर दोन ठिकाणी मोटेद्वारे पाणी उपसण्याची थारोळी आहेत. या तलावच्या पश्चिमेकडील बाजूने पेन्सिलने रेखाटले हे चित्र आहे.
अलेक्सांदर नाश(Nash, Alexander) हे भारतात आले त्यावेळी बॉम्बे इंजिनिअर्स मध्ये सेवा करीत होते तर १८३६ पासून महसूल खात्यातील दख्खन सर्वेक्षण(Revenue Survey of the Deccan) विभागामध्ये सहायक अधीक्षक (Assistant Superintendent) पदावर कार्यरत होते. त्यानंतर १८४१मध्ये त्यांना बढती मिळाली आणि १८४६ पर्यंत अधीक्षक (Superintendent) या पदावर कार्यरत होते. दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी काही पेन्सिल रेखाटणे केली त्यामध्ये विजापूर शहरातील १६, पुरंदर किल्ल्यावरील दोन आणि जेजुरगडाचे एक अशी एकोणीस चित्रांचा संग्रह लंडन येथील ब्रिटीश लायब्ररी मध्ये आहे.
सन १८४४-४५ मध्ये जेजुरीतील चित्र रेखाटताना त्यांनी होळकर तलावाच्या पार्श्वभूमीवर जेजुरीगडाचे चित्र रेखाटलेले आहे. हे चित्र कदाचित उन्हाळ्यामध्ये रेखाटलेले असावे असे वाटते कारण पावसाळ्यामध्ये होळकर तलाव पाण्याने भरलेला असतो परंतु सदर चित्रामध्ये अर्धा तलाव कोरडा दिसत आहे. होळकर तलावाशेजारी सुभेदार मल्हारराव होळकरांची छत्री असलेले मल्हार गौतमेश्वर मंदिर आहे त्याचे आणि होळकर वाड्याचे रेखाटन केले आहे. जेजुरगडाचे आणि छत्री मंदिराचे प्रतिबिंब तलावाच्या पाण्यामध्ये उमटलेली दाखविण्याची किमया चित्रकाराने केली आहे. तलावाच्या बाजूला अजूनही अस्तित्वात असलेली चिंचेची बाग या चित्रामध्ये दिसत आहे. जेजुरगडावरील उत्तर दिशेचे महाद्वार आणि पायरी मार्गावरील कमानी तसेच गडावरील मंदिराचे दोन कळस हे चित्र जेजुरीचेच आहे याबद्दल शंका येण्याचे कारण नाही.
या चित्राचे नामकरण करताना चित्रकाराची शब्दोच्चारामध्ये किंवा भाषेतील अंतरामुळे गफलत झालेली दिसते, जेजुरीला 'देवा तुझी सोन्याची जेजुरी' किंवा 'देवाची जेजुरी' असे संबो धले जाते त्याचे एकत्रीकरण करून कदाचित Dejouri (डेजोरी, दिजोरी) असे लिह्ल्यामुळे हे चित्र नक्की कोणत्या स्थानाचे आहे यामध्ये अभ्यासक साशंक होते त्यांनी de आणि ri या अक्षरांवरून हे चित्र देवगिरीचे ( दौलताबाद ) असल्याचे नोंदविले आहे, परंतु किल्ले देवगिरी आणि या चित्रामध्ये कुठल्याही प्रकारचे साधर्म्य नसल्याचे आम्हीwww.jejuri.in या संकेतस्थळावर दाखविले. डेक्कन (महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश) या प्रांतामध्ये डेजोरी किंवा दिजोरी असे कोणतेही स्थान नसल्याचे आमचे ठाम मत आहे. या संदर्भामध्ये ब्रिटीश लायब्ररी कडे संपर्क साधून चित्रातील दृश्याचे विस्तृत विश्लेषण सदर केले आहे.
दुसरे चित्र श्रीमती सारा जेन लायार्द यांनी सन १८६२ मध्ये जेजुरी गावाच्या आग्नेयेकडे आणि जेजुरगडाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पेशवे तलावावरून जेजुरगडाचे दिसणारे दृश्य जलरंगामध्ये (water colour) काढलेले आहे. चित्राचे नामकरण 'The Hindoo Temple of Jejurie - 1862' असे केले आहे. 
शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!!
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा पेज आहे. फक्त एकदा या पेजला भेट द्या__/\__
https://www.facebook.com/MAZASAHYADRIMAZAABHIMAN

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

RAIGAD FORT--- दुर्गदुर्गेश्वर रायगड ( DURGDURGESHWAR RAIGAD )

Khidkaleshwar Ancient Shiv Mandir - खिडकाळेश्वर प्राचीन शिवमंदिर