जयोस्तु हिंदुस्थानाला माझा मानाचा जय शिवराय...!
माझ्या PHOTOGRAPHY मधून छत्रपती शिवरायांचे, सह्याद्रीचे आणि गड-किल्ल्यांचे, प्राचीन मंदिरे आणि प्राचीन लेण्याचे ओजस्वी, तेजस्वी रूप तुम्हां सर्वांपर्यन्त पोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न...!
दुर्गदुर्गेश्वर रायगड...!!! हा आहे दुर्गदुर्गेश्वर रायगडच्या पायथ्याशी असलेला " नाना दरवाजा "…!!! >>> नाना दरवाजा <<< या दरवाजास ’नाणे दरवाजा’ असेही म्हणत. या दरवाजाचा संबंध गैरसमजूतीने नाना फडणिसांशी लावला जातो. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा आहे. इ.स. १६७४ च्या मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील " हेन्री ऑक्झेंडन" याच दरवाजाने आला होता. या दरवाज्यास दोन कमानी आहेत. दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकर्यांसाठी दोन लहान खोल्या आहेत, त्यांस ’देवड्या’ म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात. या नाणे दरवाजाची अवस्था खूप बिकट आहे. शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!! ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- दुर्गदुर्गेश्वर रायगडचा बुलंद, बेलाद असा " महादरवाजा "…!!! महादरवाज्याच्या बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. दरवाज्यावर असणार्या या दोन कमळा...
बोला " येळकोट येळकोट जय मल्हार "…!!! देवा सदानंदाचा येळकोट…!!! मल्हारी मार्तंड जय मल्हार…!!! Photography By--- Atul Vijay Chavan शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!! महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा पेज आहे. फक्त एकदा या पेजला भेट द्या__/\__ https://www.facebook.com/MAZASAHYADRIMAZAABHIMAN -------------------------------------------------------------------------------------------------------------------------- सोन्याची जेजुरी…!!! श्री क्षेत्र जेजुरी सह्याद्री च्या कुशीत वसलेले गाव साक्षात मल्हारीच येथे नांदतो आहे.श्री शंकराने मार्तंड भैरव अवतार इथेच धारण केला. दक्षिणे मध्ये मणि मल्लाचा संहार केल्या नंतर आपली राजधानी ही येथेच वसवली. मार्तंड भैरवाच्या मुळ अवतार ठिकाणाला म्हणजेच सह्याद्री च्या या डोंगररागांना जयाद्री नाव लाभले. आणि काळाचे ओंघात त्याचे जेजुरी झाले. या मल्हारीस हळद प्रिय म्हणून येथे येणारा प्रत्येक भक्त मुक्त हाताने हळदचूर्ण उधळीत असतो, उत्सवा मध्ये तर सारा आसमंत व परिस र भंडाराने सुवर्णमय होतो म्हणूनच जेजुरीला सुवर्णनगरी म्हटले जाते. मह...
खिडकाळेश्वर प्राचीन शिवमंदिर ऐतिहासिक कल्याण परिसरावर पूर्वी शालिवाहन राजांची सत्ता होती. शालिवाहन राजे शिवप्रेमी असल्याने कल्याण-ठाणे परिसरांत अनेक प्राचीन शिवमंदिरे आहेत. कल्याण-शिळफाटा मार्गावरील खिडकाळी येथील शिवमंदिर हे त्यापैकीच एक. काळ्या पाषाणात कोरलेले हे मंदिर खूपच आकर्षक वाटते. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराप्रमाणेच हे मंदिरही स्थापत्य आणि वास्तुशास्त्राचा आदर्श नमुनाच आहे. कल्याण -शिळफाटा मार्गावरील शिळफाटय़ाच्या अलीकडे खिडकाळेश्वर मंदिर आहे. हेमाडपंथी शिल्पकलेचा आविष्कार हे मंदिर पाहताना दिसतो. या मंदिराच्या भिंतीवर सुबक कलाकुसर करण्यात आली आहे. मंदिराचे खांब, प्रवेशद्वार, खिडकी, कोनाडे यांची रचना अप्रतिम असून एक उत्तम शिल्प पाहात असल्याचे हे मंदिर पाहताना वाटते. मंदिरातील शिवगाभारा खोलवर असून, काही पायऱ्या उतरून शिवलिंगापर्यंत जाता येते. मंदिराच्या बाहेर एक दगडी शिल्प असून, भाविक या शिल्पाचेही दर्शन घेतात. त्यामुळे ती पूजनीय शिळा असा...
Comments
Post a Comment